स्तन कर्करोग जागरूकता महिना (Breast Cancer Awareness Month)
तणावाग्रस्त जीवनाशैलीमुळे (stressful lifestyle) आजकाल अनेक आजार फार कमी वयात आणि लवकर जडण्याचे प्रमाण वाढले आहे.
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) महिलांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे (most common type of cancer). सध्याच्या परिस्तिथीमध्ये 30 वर्षे पार केलेल्या स्त्रियांमध्ये स्तन कर्करोग (breast cancer) आढळून येतो आहे. भारतामध्ये स्तनांचा कर्करोग हा झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार होणे खूप आवश्यक आहे.
स्तन कर्करोगामधील लक्षणे (Breast Cancer Symptoms)
स्तनांमध्ये किंवा काखेमध्ये असामान्य गाठ जाणवणे (abnormal growth of tumor)
स्तनाच्या त्वचेवर जाडसरपणा ,सुजन जाणवणे
स्तनावर किंवा स्तनाग्रावर लालसरपणा जाणवणे
स्तनाग्रामध्ये ओढल्याप्रमाणे वाटणे , वेदना होणे
स्तनाग्र आतमध्ये वळणे
स्तनाग्रातून पांढरा स्त्राव व्यतिरिक्त लाल ,पिवळा तरल स्त्राव निघणे
स्तनाच्या आकारामध्ये बदल जाणवणे
स्तनावर खळी किंवा सुरकुत्या पडणे
या लक्षणांनुसार वेळेत निदान होण्यासाठी सुरुवातीपासून सेल्फ ब्रेस्ट एक्सामिनेशन (Self Breast Examination)करणे खूप आवश्यक आहे.
वयाच्या 20 वर्षांपासून सेल्फ ब्रेस्ट एक्सामिनाशन म्हणजे स्वतःच्या स्तनाची चाचणी आणि 40 वर्षांवरील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी (Mammography Test) करणं आवश्यक आहे.
ज्या स्त्रियांची मासिकपाळी (Menstruation Cycle) सुरू आहे त्यांनी मासिक पाळीच्या 7 दिवसानंतर एक दिवस ठरवून प्रत्येक महिन्यामध्ये त्याच दिवशी आणि ज्यांची रजोनिवृत्ती झाली आहे म्हणजेच मासिक पाळी संपली आहे त्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये एक दिवस ठरवून त्या दिवशी चाचणी करावी.
1) हात सरळ रेषेत वर करा. हळूहळू स्तनाच्या बाहेरील बाजूकडून आतील दिशेने गोलाकार दिशेने हात फिरवा. मात्र सुरवात काखेपासून करा. एखादी गाठ, जाडसरपणा जाणवतोय का याकडे लक्ष द्या.
2) आरशासमोर उभे राहून हात कंबरेवर ठेवा. आता स्तन आणि स्तनाग्रच्या रंगात, स्वरूपात,त्वचेत काही बदल झालेत का हे पहा. तसेच स्तनाग्रातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव होत असल्यास ते पहा.
3) पाठीवर झोपून मानेखाली उशी ठेवा. ज्या बाजूच्या स्तनाची चाचणी करायची आहे तो हात सरळ रेषेत वर करा आणि दुसऱ्या हाताने चाचणी करा. या दरम्यान पूर्ण स्तनावर गोलाकार पद्धतीने हाताची बोटे फिरवून , हळुवार दाब देऊन कुठे गाठ जाणवते का ते पहा. अशाचप्रकारे दुसऱ्या स्तनाची देखील चाचणी करा.
4) अशाच पद्धतीने तुम्ही बाथरूममध्ये शॉवर खाली उभे असतांना देखील तपासणी करू शकता.
तपासणी करताना पूर्ण स्तनाचे चौफेर परीक्षण करा.काखेपासून दोन्ही स्तनांच्या मध्यापर्यंत तसेच खांद्यापासून (collar bone) पोटाच्या वरच्या भागापर्यंत गोलाकार पद्धतीने तसेच वरून खाली पूर्ण स्तन स्पर्श करून व्यवस्थित परीक्षण करा.
काही वेगळेपणा जाणवल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या .
3878 views
This form is confidential and secure, and should take less than
5 minutes
to complete.
We value your privacy and will not share your email to any third party. This will be used as a secondary method of contact only.
Posted on April 15, 2016
Posted on April 15, 2016